Friday, 30 January 2015

Sir Bachchan....always Special...!!!

Here are few young age pics of Sir Bachchan which are very special.....













Hope you all will like these......

Saturday, 16 August 2014

शिवथर घळ, महाड - दासबोधाची जन्मभूमी



दासबोधाची जन्मभूमी - शिवथर घळ, महाड

"अश्वमेध" ने आयोजित केलेली एक अविस्मरणीय वर्षासहल…३. ८. २०१४

यावर्षी टीम अश्वमेधने महाडच्या शिवथर घळ येथे वर्षासहल आयोजित केली होती. भोर-महाड रस्त्यावर खतरनाक असा वरंध घाट आहे. जीवघेणी वळणं , उतार व जावळीच्या घनदाट जंगलाच्या परिसरातून घाट उतरलं की वरंध गावाच्या अगोदर पारमाची गावाकडे जाणारा रस्ता आहे. इथून पश्चिमेकडे सपाटीने गेल्यावर कावळ्या ऊर्फ मनमोहनगड या बेलाग किल्ल्याला जाणारी वाट आहे. या प्रदेशाचा रखवालदार असलेला हा किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे. घाटातील वाघजाईचं मंदिर भेट देण्यासारखं आहे.
हा भाग सह्यादीतला अतीदुर्गम प्रदेश आहे. या भागात वरंध घाटाबरोबरच उंबडीर् , खुटा , गोप्या , सुपेनाळ , नाव्हंदीण वगैरे छोट्या पण धोकादायक घाटांनी देशावर जायला आडमार्गाच्या वाटा आहेत. पारमाचीहून उत्तरेला असलेल्या वाघजाई खोऱ्यात आहे ग्रंथराज दासबोधाची जन्मभूमी शिवथर घळ.

महाड-भोर रस्त्यावर बिरवाडी मागेर् बारसगाव 16 किमीवर आहे. बारसगावहून आतल्या बाजूला शिवथरघळ 15 किमीवर आहे. मोटारमार्ग अगदी शेवटपर्यंत आहे. हा पंधरा किमीचा प्रवास थोडा आडमार्गाचा आहे. कारण हा रस्ता दुर्गम भागातला असल्याने उंचसखल आहे. गाडी पंक्चर झाली तर जॅक लावणं कठीण जातं. तिन्हीसांजेनंतर मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. तसंच पारमाचीहून सोनुभाऊ गाठलं की पायवाटेने पाच-सहा किमीवर असलेल्या शिवथरला पायी जाता येतं. ३. ८. २०१४ रोजी पहाटे आमची बस शिवथर घळ येथे पोहोचली.

काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या काठावर कंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं वसली आहेत. या तीन गावांना शिवथर वस्त्या म्हणूनच ओळखलं जातं. सह्यादीच्या कुशीत घनदाट झाडांनी शिवथर परिसर वेढला आहे. काळ नदीच्या खोऱ्यात ही सुंदर घळ आहे. समर्थ रामदास्वामींचा मठ या परिसरात होता. म्हणूनच या घळीला समर्थ 'सुंदर मठ'ही म्हणतात.
हा जावळीचा विस्तृत प्रदेश कोकणातल्या शिवथर , आंबेनळीच्या पायथ्याच्या उमरठ या तानाजी मालुसऱ्यांच्या गावापासून ते देशावरच्या वाईपर्यंत आजदेखील घनदाट अरण्याचा आहे. या भौगोलिक परिस्थितीमुळेच रामदासांनी अफजलखानाला जावळीत खेचायचा सल्ला महाराजांना दिला. त्यानुसार महाराजांनी अफजलखानाची व त्याच्या सैन्याची पुरेपूर धुळधाण उडवली. तर अशा या जावळीत शिवथर घळी 1654 च्या पूर्वार्धात रामदास विशेष मसलत घेऊन आले. पुळे बराच काळ त्यांचं वास्तव्य इथे होतं. जावळीच्या चंदराव मोऱ्यांना स्वराज्यात आणायची त्यांची योजना होती. त्याप्रमाण महाराजांनी त्यांना स्वराज्यात समावून घेतलं. आदिलशाहाला ही बातमी समजल्यावर त्यांनी मोऱ्यांना ' चंदराव ' हा किताब बहाल केला. मोरे पाघळले व त्यांनी परत यवनांशी संधान बांधलं. समर्थांनी त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला. परत एकदा गणपतीच्या निमित्ताने त्यांना एकत्र आणलं. पुन्हा आणाभाका झाल्या. काही दिवसांनंतर मोऱ्यांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं. मोरे फिरले. मग राजांनी जावळीत घोडा फेकला... मोऱ्यांचं पारिपत्य केलं. या झुंजीचा स्वराज्याला मात्र अतोनात फायदा झाला. मोऱ्यांच्या पदरचे महापराक्रमी व तेजस्वी बाजीप्रभू देशपांडे महाराजांना येऊन मिळाले. इकडे समर्थांचं दासबोध लिहिणं सुरू होतं. समर्थांनी त्यांच्या शब्दात सांगायचं तर ' येकांती विवेक करोनी! इष्ट योजना करावी ' असा महाराजांना सल्ला देत अखंड सावधपणा ठेवला. समर्थांच्या शिष्यांनी वेळप्रसंगी बैरागी , गोसाव्यांच्या , वैदूंच्या , डोंबाऱ्यांच्या वेषात राहून स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या यवनी फौजांच्या बातम्या महाराजांनाकळवण्याचं काम केलं. कोकण व देशावर समर्थांचे लहान मोठे मठ कार्यरत झाले. इथून त्यांची आध्यात्मिक चिंतनाबरोबरच कावळ्याच्या नजरेने हेरगिरी सुरू होती. समर्थांचे सगळे शिष्य निष्णात घोडेस्वार व युद्धकलेत निपुण होते. असं म्हणतात , की ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काही ऐतिहासिक पराक्रम केला त्या जागांभोवती रामदासी मठांचं जाळं विणलेलं दिसतं.

आजदेखील हा प्रदेश अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. याला समर्थ सुंदरमठ असंच म्हणत असत. हमरस्त्यापासून आत असलेल्या या सुरम्य स्थळी सरत्या पावसाळ्यात निबिड अरण्यातील शांतता अनुभवायला मिळते. पावसाळ्यात इथला साधारण 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा व इथलं धुंदकुंद वातावरण वर्णनापलीकडचं आहे. समर्थ म्हणतात , गिरीचे मस्तकी गंगा , तेथुनि चालली बळे , धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे... तर काळ नदीच्या पवित्र परिसरातील ही घळ धुळ्याचे समर्थभक्त शंकरराव देवांनी 1930 च्या दरम्यान शोधून काढली. घळ साधारण सव्वाशे फूट लांब व पाऊणशे फूट रुंद आहे. घळीच्या वरच्या बाजूला पायी चालत गेल्यावर घेराव या गावी मोठ्यांच्या वाड्याची ज्योती बघायला मिळतात. 

सुंदरमठ समिती इथली सर्व व्यवस्था समर्थपणे बघते. त्यांनी इथे सिद्धाश्रम नावाची वास्तू भक्तांसाठी बांधली आहे. समिती सर्व वयोगटांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवते. समितीच्या निरपेक्ष तरुण व अनुभवी अशा कार्यर्कत्यांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. ते समर्थांची शिकवण समाजपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.  घळीमध्ये वाकूनच वावरावे लागते. कारण त्याचे छत कमी उंचीवर आणि खडबडीत आहे. घळीमध्ये रामदास स्वामी व त्यांनी सांगितलेला "दासबोध' लिहून घेतानाचे कल्याण स्वामी, या दोघांच्या मूर्ती आहेत. शेजारीच रामाचे छोटेखानी मंदिर आहे. घळईत काही वेळ घालवणे हा खूप सुखद अनुभव आहे. आजूबाजूच्या दाट झाडीतून येणारा पक्षांचा गुंजारव आणि शेजारच्याच पाषाण समूहावर बरसणाऱ्या धबधब्याचा आवाज घळई सोडल्यावरही कानात घुमत राहतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणाला शक्‍यतो पावसाळ्यातच भेट द्यावी.



शिवथर घळ गिरीदुर्गाचे सुशोभिकरण करण्यात आलं आहे. पर्यटकांना चढण्यास सोपं जावं यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. पायऱ्यांना दोन्ही बाजूला लोखंडी रॉडही बसवण्यात आले आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोरच 'शिवथर घळ संुदरमठ सेवा समिती'ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. शिधा दिल्यावर इथे जेवणाची सोयही होते. इमारतीवरून जाणारा रस्ता थेट घळीपाशी जातो. या घळीमध्ये बसून समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना केली. इथे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची मूतीर् आहे. या मूतीर्ंच्या संरक्षणासाठी काचेचं तावदान बसवण्यात आलं आहे. यामुळे पर्यटकांना दर्शन घेता येतं आणि मूतीर्ंचं सौंदर्यंही टिकून राहतं. या घळीच्या समोर सुंदर धबधबा आहे. तिथल्या शांत परिसरात हा धबधबा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

उन्हाळा आणि हिवाळ्यात या धबधब्याचं रूप अतिशय शांत आणि मनोहारी असतं. कानात गुजगोष्टी केल्याप्रमाणे किंवा एखाद्या नाजूक युवतीच्या मधाळ स्वरासारखं या धबधब्याचं रूप भासतं. याउलट पावसाळ्यात हा धबधबा उग्र रूप धारण करतो. लांबवरही या धबधब्याचा आवाज स्पष्ट येतो. घळीजवळ गेल्यावर या धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर येऊन क्षणार्धात आपल्याला ओलेचिंब करतात. शेजारी असलेला माणूस मोठ्याने आपल्या कानाशी ओरडला तरी त्याचा आवाज ऐकू येणार नाही इतका प्रचंड आवाज या धबधब्याचा असतो. धबधब्याचं उग्र रूप पाहण्याचा आनंद घेण्यासाठी खास सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. लोखंडाचे बार डोंगराच्या कड्याला बसवण्यात आले आहे. घळीच्या वरच्या डोंगरसपाटीवर चंदराव मोरेंच्या वाड्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात. इथल्या डोंगर सपाटीवरून रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगडाचं दर्शन होतं. शिवथर घळीपासून हे चार किल्ले समान अंतरावर आहेत.

शिवथर घळीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घळीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी जाऊन पोहोचतो.

इथे जाण्यासाठी महाडवरून रस्ता आहे. महाड सोडल्यावर पुढे एखाद दोन किलोमीटर अंतर पार करण्याच्या आधी डावीकडे एक रस्ता जातो. तिथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. या रस्त्यावरून गेल्यावर पारमारची गाव लागते. या गावाहून ३० किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण शिवथर घळीच्या पायथ्याशी पोहचतो. तसंच गोप्या घाट पार करून पुणेमागेर्ही येता येते. हा दुसरा मार्गही जरा अवघड आहे. पुण्याहून निघाल्यावर राजगड, भुतोंडे, बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाट पार करून कसबेमागेर् शिवथर घळीला पोहोचता येते.
अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. सगळ्यांनी एकदातरी नक्कीच भेट द्या.