Friday, 12 February 2016

आपल्या माणसाचं गाणं...मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ३१ डिसेंबर, २०१५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांना त्यांच्याच कवितेतून वाहिलेली श्रद्धांजली... 

आपल्या माणसाचं गाणं...
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

दिसत नाही फुल
तरी वास येतो!
तुम्ही म्हणाल भास होतो!
भास नव्हे:अगदी खरा
गालांवर श्वास येतो!

मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धूपासारखी भरून टाकते सगळी खोली!

ज्याचं त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं!
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

आपण आपलं काहीवाही करत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत
वेळ आपला भरीत असतो!
जरा थांबा
आठवून बघा:

एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरतर आजूबाजू कुणीच नसतो!

हसता हसता कोण आपले डोळे पुसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी
पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी!

घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

खिडकीतून दिसणारा
निळा तुकडा कुणाचा?
फांदिमागे चंद्र आहे
हसरा मुखडा कुणाचा?

एकांतात उगवणारा
एक तर कुणाचा?
निरोप घेवून येणारा
ओला वारा कुणाचा?

डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसत?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
 
 
असे हे आपलं माणूस खरोखरच कितीहि दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ होतं, आहे आणि राहणार….!!
 
लाडक्या कवीला पुन्हा भावपूर्ण आदरांजली..!!
 
                                            - रविश ठाकुर     
 

Friday, 17 April 2015

बॉलीवूड, राजकारण आणि बलात्कार


बॉलीवूड, राजकारण आणि बलात्कार:



आपल्या येथे डान्सबार/ वेश्याव्यवसायावर सरकार बंदी घालते. पण असे असतांनाही दुसरीकडे मात्र सेन्सॉर बोर्ड याबाबतीत काही कठोर भूमिका घेत आहे असे काही दिसत नाही. अमेरिकन पाँर्नस्टार सनी लियोनला भारतात लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलय. तीला बाँलिवुडमध्ये अभिनेत्री करण्यापर्यँत या लोकांची मजल पोचते तरी कशी? परवा " कॉमेडी नाईट्स विथ कपिल" च्या कार्यक्रमात सुद्धा तीला बोलावण्यात आले होते. "बिग-बॉस" च्या मागच्या सिझन मधेही तीला बोलवण्यात आले होते. दिवसेंदिवस प्रोड्युसर तीला  नवीन नवीन चित्रपटात काम करायला लावून आपला चित्रपट कसा चालेल याकडे लक्ष देत आहेत. नवीन पिढीला सनी लियोन कुठले आदर्श घालून देणार हो? आपल्या एवढ्या मोठ्या भारत देशात चित्रपटात अभिनय करु शकणारी दुसरी कोणी अभिनेत्रीच शिल्लक राहिली नाही का हो???? की यापुढे जास्तीत जास्त प्रणय द्रुश्ये, भडक कपडे, चुंबनद्रुश्ये हेच बॉलीवूड च्या चित्रपटांचे प्रमुख विषय असणार आहेत?? आजचे बॉलीवूड हे निव्वळ पश्च्यात्यांचे अनुकरण राहिलेले आहे.






देशात कोठेही बलात्कार झाला की आपल्याला समाजाची भरपुर काळजी असल्यागत याच आपल्या नट्या हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर येतात. त्यावेळी त्यांना जाब विचारला पाहिजे की पडद्यावर उघड्या अंगाने नाचताना तुमचे सामाजिक भान कोठे गेलेले...?? यांच्या पडद्यावरील बिभीत्स वर्तनाने मुळातच ताळतंत्र सोडलेली तरुण पिढी ख-या आयुष्यातही ते शारिरीक सुख घेऊ पाहतात आणि निर्भया, शक्तीमील सारख्या घटना घडतात. मात्र यामध्ये बळी जातो तो बिचा-या सभ्य, सुसंस्क्रुत मुलीँचा...! म्हणून एका बाजूने बॉलीवूडसुद्धा देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांना अप्रत्यक्षरित्या जबाबदार असे माझे मत आहे. अगोदर सेन्साँर बोर्डाचे नियम कडक करा आणि पडद्यावरील नट्यांचे देहप्रदर्शन, प्रणय थांबवा. यामुळे माझ्यामते देशातील बलात्काराचे प्रमाण थोडे तरी कमी होईल. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या साल २०१४ च्या एका अहवालानुसार भारतात दिवसाला सुमारे ९३ स्त्रियांवर बलात्कार होतात आणि हे प्रमाण दररोज वाढतच आहे.

बलात्कार्यांना कठोर शिक्षेबद्दल आतापर्यंत खूपदा चर्चा झाली आहे. आणि आता त्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतुद निच्छितपणे स्वागतार्ह आहे. मागे मुंबई उच्च न्यायालयाने शक्तीमील प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. अतिशय अभूतपूर्व आणि योग्य निर्णय घेण्यात आला. त्याचे देशभरातून स्वागत झालं. पण त्याची अंमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे. पण मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुलायम सिंग व अबु आझमी सारखे करंटे  किती अकलेचे तारे तोडत होते??  म्हणे ती बलात्कार करणारी लहान मुले आहेत आणि तशा चुका होत असतात त्यामुळे त्यांना फाशी का द्यावी. वा रे मुलायम अन आझमी...तुम्ही अशा भगिनींच्या जखमेवर मीठ चोलताय काय??? तुमच्या घरात मुली, पत्नी, माता, भगिनी नाहीत का???? त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर तुम्ही मुग गिळत बसणार का???? असे नेते सुद्धा या बलात्कारासारख्या घटनांना कारणीभूत आहेत. अशा नेत्यांवर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजेत. माझे जनतेस आवाहन आहे कि अशा नेत्यांना आता निवडणुकीत चांगलाच हिचका दाखवून द्यावा. निवडून आल्यानंतर मोदी सरकारने मुली वाचवण्यासाठी "बेटी पढाओ, बेटी बचाओ" मोहीम सुरू केली. ती निश्चितच स्वागतार्ह आहे. पण याबरोबरच मुलींच्या सुरक्षिततेबदल पण उपाययोजना करण्याची खूप निकडीची गरज आहे.
राजकारण्यांनी या घटना गांभीर्याने घेण्याची नितांत गरज आहे. भारतात अनेक कायदे आहेत परंतु त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होतांना दिसतच नाही. राजकीय पुढाऱ्यांनी याबाबतीत विधानसभा आणि संसदेमध्ये वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. जोपर्यंत अशा गुन्ह्यामध्ये कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत असे वासनाधुंद नराधम निरपराध निर्भयांचे बळी घेतच राहतील. तुम्ही माझ्या मतांशी सहमत आहात का? असल्यास क्रृपाकरून हा संदेश पुढे पाठवा, जेणेकरून

बॉलीवूड आणि राजकारण्यांपर्यंत तो पोहोचल.

आपला मित्र,

रविश ठाकुर

जय हिंद, जय महाराष्ट्र...!!!